
कोल्हापूर: भारतीय तरुणांकडे आज ज्ञान आहे,कौशल्य आहे पण तरीही मनासारखी नोकरी मिळत नाही,योग्य व प्रामाणिक मार्गाने पैसा कसा मिळतो याचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही.व्यवसायाला सुरुवात केली पण त्यातही यश नाही,मध्यमवर्गीयांना पैसा मिळवून स्थिर स्थावर होण्याचा मार्ग सापडत नाही.आत्ता स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेला सामोरे कसे जायचे कुठून सुरुवात करावी हे समजत नाही यामुळे ती व्यक्ती आपला आत्मविश्वास गमावण्याची शक्यता असते.नकारात्मक विचारांनी आपली प्रगती खुंटते,यश ही एक प्रक्रिया आहे.त्यानुसार गेले तरच कायमस्वरूपी यशाची गुरुकिल्ली सापडते.आज जगात पैसा ही महत्वाची गोष्ट आहे.पण त्याचे नेमके मिळवण्याचे रहस्य काय हेच समजत नाही.या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आशेचा महेंद्र देवळेकर यांचे मार्गदर्शनअगदी मोलाचे आहे.आजपर्यंत १ लाख ६० हजार लोकांना यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे.बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी,व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी,विद्यार्थांना त्यांचा शिक्षणाचा उपयोग योग्य पद्धतीने होण्यासाठी आणि पालकांना आपल्या मुलांना घडविण्यासाठी महेंद्र देवळेकर यांचे व्याख्यान उपयुक्त ठरले आहे.असे जगप्रसिद्ध व्याख्याते कोल्हापुरात प्रथमच आले आहेत.३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ‘आय लव मनी’ या विषयावर शाहू स्मारक भवन,दसरा चौक येथे सर्वांसाठी मोफत व्याख्यान होत आहे.आज प्रत्यक्ष महेंद्र देवळेकर यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.
अंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक आणि पुरस्कार विजेते महेंद्र देवळेकर गेले १५ वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत.त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आज लोक गर्दी करत आहेत.पॉवर ऑफ माइंड,व्यक्तिमत्व विकास,यशस्वी होण्याचे मार्ग,हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यातील फरक,सेल्स आणि मार्केटिंग अश्या अनेक विषयांवर अनेक विषयांवर देवळेकर यांनी व्याखाने दिली आहे.ज्याचा फायदा लाखो लोकांना होत आहे.कोल्हापुरकारांसाठी देवळेकर यांचे व्याख्यान म्हणजे पर्वणी आहे.आज जगभरातील लाखो तरुण देवळेकर लिखित पुस्तके,सीडी,व्हिडीओ यांना उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत.कोल्हापुरात अनेक महाविद्यालयात त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होत आहे. याच व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याची संधी कोल्हापुरकारांसाठी उपलब्ध झाली आहे.तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. या सेमिनारसाठी डीवायपी ग्रुप आणि एनजीओ कंपझन 24 युथ यांचे सहकार्य लाभले आहे.
Leave a Reply