
कोल्हापूर: कोल्हापुरातील टाईम इन्स्टिट्यूट आणि केम असोसिएशनच्यावतीने ६ ऑगस्टला जीएसटीविषयक प्रशिक्षण शिबीर विविध घटकांसाठी आयोजित केले आहे.सध्या सर्वच क्षेत्रात जीएसटी विषयी संभ्रमावस्था आहे.यासाठीच प्रत्येक क्षेत्राची गरज लक्ष्यात घेऊन प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.तरी यातील पहिला टप्पा म्हणून ६ ऑगस्ट रोजी हॉटेल वूडलँड येथे सकाळी ९.३० ते ६ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण शिबीर होणार आहे अशी माहिती टाईम इन्स्टिट्यूटचे राजेंद्र शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
१ जुलै पासून संपूर्ण राज्यात एकाच कर म्हणजे वस्तू आणि सेवा कर जीएसटी लागू करण्यात आला.पण याबाबत सर्वच क्षेत्रात उलथापालथ झाली.यासाठी हे शिबीर खूप उपयुक्त ठरणार आहे.आजपर्यंत टाईम इन्स्टिट्यूटने स्कील इंडिया,मेक इन इंडिया कौशल्य विकास योजना राबविल्या आहेत.शासनाचे अधिकृत केंद्र असणाऱ्या या टाईम इन्स्टिट्यूटमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी रोजगार पूरक शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक बनले आहेत.विद्यार्थी,व्यापारी,उद्योजक,कंपनी.संस्था यांच्यासाठी अभ्यासक्रम बनविला आहे.सर्वच घटकांसाठी एक ते सहा दिवसापर्यंत शिबिरे घेण्यात येणार आहेत.याचा लाभ घ्यावा असे आवाहन टाईम इन्स्टिट्यूट आणि केम असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ०२३१-२५२२६१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.पत्रकार परिषदेला केम असोसिएशनचे संचालक गिरीश कुलकर्णी,राजेंद्र भोसले,अजय धुरी,वैभव केंजळे उपस्थित होते.
Leave a Reply