
कोल्हापूर: राजा पंढरीचा या यशस्वी चित्रपटानंतर चंद्रभागा हा भक्तीप्रदान मराठी चित्रपट उद्या म्हणजेच ४ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.संतांच माहेरघर पंढरपूर आणि तिथे विटेवर २८ युगे उभा असणारा विठ्ठल हेच त्यांचे दैवत आणि या दैवताच्या प्राप्तीसाठी अनेक वारकरी आणि भक्तांनी पंढरीची वाट धरली.अश्याच एका वयोवृद्ध वारकऱ्याची कथा म्हणजे ‘चंद्रभागा’ हा चित्रपट होय.आजच्या स्त्रीवर्गाला आदर्श ठरेल असा लढा दर्शविणारा आणि सत्य घटनेवर आधारित कथेवर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती चित्रपटाचे कथा-पटकथा दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले ‘बाळ धुरी,अंकिता पनवेलकर,उषा नाईक आणि महेश कोळी असे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.यात एकूण सात अभंग स्वरुपात गाणी असून वैशाली माडे,सुरेश वाडकर,आदर्श शिंदे यांनी ती गायली आहेत.वारकरी आणि त्यांच्या व्यथा यात प्रकर्षाने मांडल्या आहेत.वारकरी आणि त्यांची निस्वार्थी वृत्ती,त्यांचे विठ्ठलावरील निस्सीम भक्ती या धर्तीवर हा चित्रपट असल्याने लोकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वासही शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला.
Leave a Reply