
कोल्हापूर: महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागाने आज केलेल्या संयुक्त कारवाईत टिंबर मार्केट भाजी मंडई व परिसरातील 50 अतिक्रमीत शेड, टपऱ्या हटविण्यात आल्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विभागीय कार्यालय क्र.1, गांधी मैदान विभागीय कार्यालयामार्फत अतिक्रमण निर्मुलण मोहिम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत आज टिंबर मार्केट भाजी मंडई व परिसरातील 50 शेड व टपऱ्या हटविण्यात आल्या. यावेळी भाजी विक्रेत्यांनी विरोध केलेने याठिकाणी बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच क्रशर चौकातील विनापरवाना चायनीज स्टॉल हटविण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरात राजकपूर पुतळा, क्रशरचौक, सानेगुरुजी- राधानगरी रोड, देवकर पाणंद चौक, टिंबर मार्केट, भाजी मंडई या परिसरातील एकूण 50 डिजीटल होर्डिंगव विदयुत पोलवरील 75 बॅनर्स हटविण्यात आले. यावेळी राजवाडा पोलिस स्टेशनकडील मोठा पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.
सदरची कारवाई उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुनिल भाईक, सागर शिंदे, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार यांचे मार्गदर्शनाखाली पवडी, इस्टेट, विद्युत व अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी यांचेमार्फत करण्यात आली.
सदरची अतिक्रमण कारवाई अशीच चालू राहणार असून संबधीतांनी विनापरवाना डिजीटल बोर्ड/ बॅनर व अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे
Leave a Reply