स्टार प्रवाहच्या मालिकांमधील नायिकांचा मेकओव्हर !

 

टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात,त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वातमहत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे  यांचे अनुकरण केले जाते, त्याची फॅशन तयारहोते. या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलत नाही. मात्र, स्टार प्रवाहने एकवेगळा प्रयोग केला असून  सर्वच मालिकांच्या नायिका आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्याआहेत. फक्त नव्या रूपात नाही, तर त्यांचा मेकओव्हर झाला असून, या नायिका आता अधिकचग्लॅमरस झाल्या आहेत.

 

स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या मालिका सादर केल्याआहेत. या मालिकांतील व्यक्तिरेखा, विशेषतः नायिकांवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे.त्यामुळेच नायिकांच्या दिसण्याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असतं. इतकंच नाही, फॅन्स नायिकांना सोशलमीडियावर फॉलोही करतात. त्यांच्या हेअरस्टाईल, कपडे, दागिने, त्यांचं स्टाईल स्टेटमेंट असं सारंकाही… ‘नकुशी’ मधील नकुशी, ‘गोठ’ मधील राधा, ‘दुहेरी’ मधील सोनिया, ‘लेक माझी लाडकी’मधल्या मीरा आणि सानिका आणि ‘कुलस्वामिनी’ मधील आरोही या व्यक्तिरेखांचा मेकओव्हरझाला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा मेकओव्हर कथानकाची आणि त्यांच्या भूमिकांची गरज म्हणूनकरावा लागला आहे. या मेकओव्हरनं या सर्वच नायिका आता मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसू लागल्याआहेत. विशेष म्हणजे त्याची दखल सोशल मिडियातून घेतली जात असून या नायिकांचे नवे रूपफेसबुक आणि व्हॉटसअप पोस्ट मधून व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!