राज्यव्यापी कोष्टी समाज वधु-वर मेळाव्याचे इचलकंरजीत १३ ऑगस्ट रोजी आयोजन

 

इचलकंरजी: महाराष्ट्राची मॅचेस्टर नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरजीत येत्या १३ ऑगस्ट रोजी रविवारी समस्त कोष्टी समाज वधु – वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे . राजीव गांधी सांस्कृतिक भवन सभागृहात एलईडी स्क्रीन सह पुर्ण दिवस हा सोहळा संपन्न होणार आहे . या साठी परगांवाहून येणारे कुंटुबियासाठी आदल्या दिवशी शनिवारी यांच ठिकाणी निवासाची व भोजनाची सोय ही करण्यात आलेली आहे . या उपक्रमाची तयारी गेली अडीच महिने महाराष्ट्रातील विविध गावामध्ये प्रवास करून माहिती देऊन केली जात आहे . यात कोष्टी समाजातील सर्व पोटजाती चे वधू वर सहभागी होणार आहेत . सकाळी नऊ पासून यास प्रारंभ होणार आहे. देवांग कोष्टी समाजाचे ज्येष्ठ कार्यकतै बळीराम दादा कवडे , विश्वनाथ मुसळे , विठ्ठलराव डाके सह मान्यवराची या वेळी उपस्थीती आसणार आहे .सहभागी वधू वराचा अनौपचारिक वातावरणात सहज संवाद साधत व्यासपीठावर परिचय करून देणेत येणार आहे . याचे नियोजनासाठी संयोजक समस्त कोष्टी समाज वधू वर सुचक कार्यकुशल संघटना यांचे वतीने अध्यक्ष किसन तारळेकर , उपाध्यक्ष दत्तात्रय टकले सह मनोहर ढवळे , नंदू टेके , कृष्णात कडोलकर , उमेश ताटपुंजे , शिला कुरकुरे , सावित्री हजारे , संगिता खारगे , उर्मिला फासे , सुवर्णा डाके सह शंभर हून अधिक कार्यकतै कार्यरत आहेत .नोंदणी केलेल्या आणि सहभागी वधू – वराची सचित्र माहिती पुस्तिका ही संपर्क भ्रमणध्वनी क्रमांकासह संयोजक प्रसिध्द करणार आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!