
कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.समीरचे वकील विरेंद्र इचलकरंजीकर यांनी 7 नोव्हेंबर रोजी समीरला पानसरे हत्ये प्रकरणी महत्वाची माहिती द्यायची आहे त्यासाठी त्याला न्यायालयात हजर करावे या मागणी साठी अर्ज केला होता.पण समीरला न्यायालयात हजर केले होते तेव्हा त्याला ही माहिती देता आली असती या करणास्तव न्यायमूर्ती आर. डी.डांगे यांनी सुनावणीवेळी समीरचा अर्ज फेटाळून लावला.समीर गायकवाड ची पोलिस कोठडीची मुदत 21 तारखेला संपत आहे. यावर पुढे काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
Leave a Reply