
तिरुमल : आंध्र प्रदेश येथील तिरुमल येथे प्रचंड पाऊस झाल्याने तेथील जन जीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. व्यंकतेश्वरा म्हणजेच तिरुपति ला जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने तो मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच सम्पूर्ण मंदिरास पाण्याने वेढा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा सागरी किनाऱ्यावर निर्माण झाल्याने इतका पाऊस पडला. या महिन्यात व्यंकतेश्वरा व देवी पद्मावती यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात तिरुमल डोंगरावर साजरा केला जातो. यासाठी पर्यटक गर्दी करतात पण पावसाने त्यांचेही हाल होत आहे.
Leave a Reply