
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रेस फोटोग्राफरला फोटो घेण्यास पुजारी बाबूराव ठाणेकर यांनी मनाई केल्याचा प्रकार आज घडला. याचा अंबाबाई भक्त व पुजारी हटाव संघर्ष समितीकडून निषेध करण्यात आला.
आज एक प्रेस फोटोग्राफर अंबाबाई मंदिरात देवीचे तसेच मंदिर आवारातील फोटो घेण्यास आला होता. या वेळी नगरसेवक व पुजारी अजित ठाणेकर यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांनी तेथे येऊन त्याला फोटो घेण्यास विरोध केला. यावेळी त्यांच्यात काही वेळ वादही झाला. या प्रकाराचा अंबाबाई भक्त व पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकाद्वारे निषेध केला आहे.आज दुपारी अंबाबाई मंदिरमध्ये कोल्हापूरमधील फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी गेले होते.त्याचवेळी मंदिरात दत्तात्रय उर्फ बाबूराव ठाणेकर मंदिरात आले होते ठाणेकर यांना मंदिरातून बाहेर काढण्यात होते त्याचवेळी बाबूराव ठाणेकर यांनी फोटोग्राफरचा कॅमेरा ओढला व काढून घेण्याचा प्रयत्न केला .
Leave a Reply