पगारी पुजारी नेमण्याच्या निर्णयाचे शिवसेनेकडून साखर पेठे वाटून स्वागत

 

कोल्हापूर: देशभरासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भ्रष्टाचार होत आहे. श्री अंबाबाई ला भाविकांनी श्रद्धेने दान केलेले दागिने, रोख रक्कम आदी वस्तूंची लुट पुजाऱ्यांच्या कडून होत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या लाखो करोडो रुपयांच्या जमिनींचा अपहारही झाला आहे.गेले दोन ते तीन महिने कोल्हापूर अशांत आहे. श्री अंबाबाई ला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान पुजाऱ्यांकडून होत आहे. याला कोल्हापूर शहरातील जनतेने तिव्र विरोध केला आहे. श्री अंबाबाई च्या पोशाखावरून समस्त भाविकांच्या भावनाही या पुजार्यांनी दुखावल्या आहेत. गेली कित्तेक वर्षे मंदिराच्या गाभार्यात ठाण मांडून बसलेल्या या पुजार्यांनी भाविकांची अक्षरश: लुट केली आहे. राजर्षि छ. शाहू महाराज यांच्या आदेशानुसार श्री अंबाबाईच्या नित्यनियमित पूजेसाठी काही पुजाकांची नेमणूक केली होती. परंतु ज्या पुजार्यांची नेमणूक केली आहेत त्यातील एकही पुजारी सध्या कोल्हापुरात नाही आहे. या पुजार्यांनी कमिशन बेस वर दुसर्या पुजार्यांची नेमणूक श्री अंबाबाई मंदिरात केली आहे आणि त्यांच्याकडून आर्थिक लाभापोटी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला श्री विष्णू पत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान रचण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातील भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पुजारी हटवून,त्याठिकाणी शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर च्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत, अशी जोरदार मागणी कोल्हापूर वासियांकडून होत आहे.आज मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नास यश आले असून, श्री अंबाबाई मंदिरात “पगारी पुजारी” नेमण्याकरिता येत्या ३ महिन्यात कायदा करू, तर प. देवस्थान समितीतील घोटाळ्याची आणि सर्वच प्रकारची येत्या १५ दिवसात बैठक लावू, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री नामदार रणजीत पाटील यांनी दिली. या निर्णयाचे कोल्हापूर शहरातील सर्वच स्थरातून स्वागत होत असून, शिवसेनेच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून छ. शिवाजी चौक येथे साखर – पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी शिवसेनेचे किशोर घाटगे, दीपक गौड, रमेश खाडे, सुनील जाधव, विशाल देवकुळे, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, अमित चव्हाण, अनिल पाटील, प्रकाश सरनाईक, अश्विन शेळके, कमलाकर किलकिले, विष्णुपंत पोवार, अजित गायकवाड, आण्णा पसारे, सुनील खोत, राजू काझी, सुरेश कदम, अक्षय कुंभार, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!