
कोल्हापूर: भारतात पहिल्यांदाच लोकांना उपयुक्त आणि पदोपदी त्यांच्या समस्या सोडविणारा गरज मॉलचे कोल्हापुरात पालकमंत्री चंद्र्कांतदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उद्घाटन होत आहे.भारतात मुलांच्या टीवी आणि मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन वाढते आहे.तसेच सध्या भेसळयुक्त आहार यामुळे आजारांचे प्रमाण वाढते आहे.शेतकरी आत्महत्या करत आहेत.तरुणांना रोजगार नाही.या सर्व समस्यांवर ठोस उपाय असणारा प्रात्यक्षिकांसह भारतातील पहिला वैज्ञानिक मॉल १३ ऑगस्टला नाळे कॉलनी येथे सुरु होत आहे अशी माहिती संचालक सुहास बादल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या मॉलमध्ये सेंद्रिय भाजीपाला,मुलांचे टीवी वेद कमी करणारी विविध विज्ञान खेळणी आणि प्रयोग,एक मिनिटात होणाऱ्या इन्स्टट रेसिपीज,घरीच भाजीपाला तयार करणारा व्हर्टिकल गार्डनिंग,स्वयंपाकघरातील कामे सोपे करणारी विविध छोटी उपकरणे,प्रदूषण विरहीत फटाके,भेसळविरहीत आहारविषयक यंत्रे यांचा समावेश असणार आहे.तसेच लोकांची गरज संपल्यानंतर ज्या गोष्टी घरात पडून रहातात त्या वस्तूही ज्यांना खूप गरज आहे त्यांना विकत देण्याचे एकमेव दालन म्हणजे हा मॉल होय.तसेच कोल्हापुरातील सामाजिक संघटनांनी तयार केलेल्या वस्तू इथे विक्रीस ठेवल्या आहेत.स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी,महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी अनेक उपकरणे इथे भाड्याने मिळणार आहेत.जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल.तसेच तुमच्या छंदाचे रुपांतर व्यवसायात करण्याची संधी येथे मिळणार आहे.दर रविवारी काळाच्या ओघात लोप पावत चाललेली लिलाव ही संकल्पना पुन्हा येथे राबविण्यात येणार आहे.एकूणच मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या या मॉलला भेट देणे गरजेचे आहे.पत्रकार परिषदेला सावली केअरचे किशोर देशपांडे,महेश घोटखिंडीकर,उदय भेन्डीगिरी,अमित हुक्केरीकर उपस्थित होते.
Leave a Reply