
कोल्हापूर: कै.भालचंद्र चिकोडे वाचनालय आणि कोल्हापूर कँसर सेंटरच्यावतीने मौखिक आणि अन्य प्रकारच्या कर्करोग या संदर्भात ‘सर्ज फेस्ट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.महिलांचा स्तनाचा कर्करोग,मौखिक आणि अन्य कर्करोग या संदर्भात मौखिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी हॉटेल सयाजी येथे या फेस्ट चे आयोजन केले आहे.यामध्ये कर्करोगावरील शस्त्रक्रिया याविषयावर परिसंवाद होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण सन्मानित टाटा मेमोरियल हॉस्पिटल चे माजी संचालक आणि आशिया खंडातील निष्णात कर्करोग तज्ञ डॉ.प्रफुल्ल देसाई असणार आहेत.पालकमंत्री चंद्र्कांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने सायन्स मेडिसिन आणि टेक्नोलॉजी …व्हेअर वुई आर गोइंग या विषयावर डॉ.देसाई मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती कोल्हापूर कँसर सेंटर चे डॉ.सुरज पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या फेस्ट मध्ये ३०० डॉक्टर्स ,सर्जन आणि तज्ञ सहभागी होणार आहेत.यांचा फायदा कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला नक्कीच होणार आहे.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे राहुल चिकोडे यांनी सांगितले.ज्यांचे दात वाकडे आहेत किंवा डोळे तिरळेपणा आहे त्यांना या योजनेअंतर्गत मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे असे विजय जाधव यांनी आवाहन केले आहे.पत्रकार परिषदेला डॉ.संदीप पाटील,रंगनाथ हॉस्पिटलचे डॉ.प्रवीण हेंद्रे उपस्थित होते
Leave a Reply