राजधानी मुंबईत धडकले ‘भगवे वादळ’

 

मुंबई – मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव एकवटले.

मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा होईल या इर्षेनं विक्रमी संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या समाजामुळे मुंबईतील रस्ते भगवे झाले आहेत. एकच चर्चा मराठा मोर्चा, असं वातावरण निर्माण झाले.

मुंबईतील लाखोंच्या मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळापुढे काय आश्‍वासन द्यायचे याचा अभ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच करताना, कोणताही नेता नसलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये भाजपचे खासदार संभाजी राजे, कॉंग्रेस नेते आमदार नारायण राणे आणि माथाडी नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील हे पुढारी म्हणून पुढे कसे आले हा प्रश्‍न सामान्य मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पडला असला तरी, या नेत्यांचा सहभाग फडणवीस यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!