
कोल्हापूर : गेले अनेक दिवस कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी अंबाबाई आहे की महालक्ष्मी या विषयावर वादंग सुरु आहे.अश्या वादग्रस्त विषयामुळे हे तीर्थक्षेत्र बदनाम होत आहे.भाविकांमध्ये संभ्रमावस्था आहे.हाच वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी रविवारी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक येथे धर्मशास्त्रीय अभ्यासक अॅड प्रसन्न मालेकर यांचे व्याख्यान होणार आहे अशी माहिती श्री अंबाबाई भक्त समितीचे महेश उरसाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.तसेच व्याख्यान झाल्यावर जर काही शंका किंवा सूचना असतील तर त्या कागदावर लिहून सूचना पेटीत टाकण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या सूचनांचा विचार करून याविषयी निरसन करण्यासाठी पुन्हा व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे असे संभाजी साळुंखे यांनी सांगितले.देवीला कुणी काय म्हणावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे पण हे मंदिर प्राचीन आहे.आपल्या श्रद्धेच्या स्थानाबद्दल कुणी उलट सुलट बोलू नये याची काळजी सर्व कोल्हापूरच्या भक्तांनी घेतली पाहिजे असाही सूर आधी झालेल्या समितीच्या बैठकीत निघाला.या व्याख्यानास मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply