
श्रावण महिन्यात सगळीकडे व्रतवैकल्य, सण साजरे केले जात आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही हे सणवार पहायला मिळणार आहे. नकुशी या मालिकेतील बग्गीवाला चाळीत कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी होणारआहे. तर कुलस्वामिनीमध्ये आरोहीची पहिली मंगळागौर होणार का, याची उत्सुकता आहे.
नकुशी या मालिकेतील नकुशीकडे गोड बातमी आहे. त्यामुळे चाळीत उत्साहाचं वातावरण आहे. आता आलेलीकृष्णजन्माष्टमी नकुशीसाठी जास्तच आनंददायी आहे. बग्गीवाला चाळीत सर्वच सण-उत्सव साजरे होत असतात. सर्व चाळकरी एकत्र येऊन कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी करणार आहेत. ही दहीहंडी थोडी स्पेशल होणारआहे. कारण, रणजित अर्थात उपेंद्र लिमयेचं आजवर कधीच न दिसलेलं रूप प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बग्गीवाला चाळीतली कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी कशी साजरी होते, त्यासाठी चाळकरी काय काय करतात, नकुशी आणि रणजित कशा पद्धतीनं त्यात सहभागी होतात हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
कुलस्वामिनी या मालिकेत लग्न करून देवधर कुटुंबात आलेली आरोही या कुटुंबाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्नकरत आहे. तिला तिचे सासरे अच्युत देवधर यांचा पाठिंबाही आहे. मात्र, देवधर कुटुंबातल्या इतरांचा विशेषत:सुवर्णा आरोहीच्या विरोधात आहेत. कुटुंबात आरोहीचा प्रभाव वाढत असल्याने ती नाराज आहे. सुवर्णा आरोहीच्याविरोधात सतत कारस्थानंही करत आहे. आरोही राजस आणि अभय यांच्यात अडकल्यासारखी आहे. आरोहीलाहीआपली मंगळागौर व्हावी अशी इच्छा आहे. मात्र, आजवर कोणताही धार्मिक विधी न करण्याची देवधर कुटुंबाचा अट्टहास आरोहीच्या मंगळागौरीच्या रुपाने खंडित होणार का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
श्रावणातलं हे सणासुदीचं सेलिब्रेशन या आठवड्यात न चुकता पहा फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply