तीन राज्यातील वधु-वर – पालकांचा चौडेश्वरी युवा फौडेशन मेळाव्यात विक्रमी सहभाग

 

इचलकंरजी ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी  मुंबई ते आयटी नगरी बंगलूर सह बांद्या पासून चांदया पर्यत आणि बेळगांव – कार वार पर्वतच्या जीवनसाथीच्या शोधात असलेल्या वधू – वरासह पालकानी महाराष्ट्राची मॅचेस्टर नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरजीत  संपन्न झालेल्या  समस्त कोष्टी समाज वधु – वर परिचय मेळाव्यास प्रंचड उत्साहात उपस्थिती लावली. चौंडेश्वरी युवा फौडेशन आयोजित हा सोहळा राजीव गांधी सांस्कृतिक भवन सभागृहात  पुर्ण दिवस हा सोहळा संपन्न झाला .                           

  सनईच्या सुरावटीत समाजातील पदाधिकारी  मान्यवराच्या शुभ हस्ते  चौडेश्वरी देवी प्रतिमा पूजन करून यांचा उत्साही प्रांरभ झाला .प्रांरभी सर्वाचे स्वागत करताना प्रमुख संयोजक मनोहर ढवळे यांनी उपक्रमाची तयारी सुरू असून गेली अडीच महिने महाराष्ट्रातील विविध गावामध्ये प्रवास करून संयोजकानी  माहिती  दिली असल्याचे नमूद केले .चौडेश्वरी युवा फौडशनचे अध्यक्ष प्रशांत सपाटे यांनी या मेळाव्यात  कोष्टी समाजातील सर्व पोटजाती चे वधू वर सहभागी होत आहेत , ही मोठी जमेची बाजू असल्याचे नमूद केले. कोल्हापूर देवांग कोष्टी समाजाचे ज्येष्ठ कार्यकतै बळीराम दादा कवडे , इचलकंरजी चे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे , उयोगपती विठ्ठलराव डाके , सूत गिरणी चेअरमन  सुनील राव सांगले  धोंडिराम कस्तुरे, कार्याध्यक्ष प्रमोद मुसळे  सह मान्यवरानी  दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन केले. आणि शुभेच्छा दिल्या.  या उद्घाटन  सत्राचे आभार प्रदर्शन मार्गदर्शक  बाळकृष्ण ढवळे यांनी केले.  या नतंर सहभागी वधू वराचा अनौपचारिक वातावरणात सहज संवाद साधत शायरन फिचर्स च्या सीमा राजेंद्र मकोटे नी व्यासपीठावर परिचय  सांयकाळी ऊशिरा पर्यत करून दिला . तसेच उपस्थित नसलेल्या पण नोंदणी केलेल्या वधू -वराचे एलईडी स्क्रीनवर फोटोसह माहितीही सांगण्यात आली .  याचे नियोजनासाठी संयोजक चौडेश्वरी युवा फौडेशन चे अमोल डाके , संजय सातपुते , भाऊसो साखरे , संदीप हावळ , दयानंद लिपारे , रोहिदास भंडारे सह  किसन तारळेकर , उपाध्यक्ष दत्तात्रय टकले सह मनोहर ढवळे , नंदू टेके , कृष्णात कडोलकर , उमेश ताटपुंजे , शिला कुरकुरे , सावित्री हजारे , संगिता खारगे , उर्मिला फासे , सुवर्णा डाके सह शंभर हून अधिक कार्यकतै कार्यरत होते .नोंदणी केलेल्या आणि सहभागी वधू – वराची सचित्र माहिती पुस्तिका ही संपर्क भ्रमणध्वनी  क्रमांकासह संयोजक प्रसिध्द करण्यात येणार असून त्यास उद्योग -व्यावसायिकाची संदर्भ   माहितीचा ही समावेश केला जाणार असल्याचे ही या वेळी घोषित करण्यात आले . एकंदीत  गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर समस्त कोष्टी समाजाचे पुणे , औरंगाबाद , येवला -नाशिक , बीड , परभणी , तळ कोकण – पश्चिम महाराष्ट्रासह तीन राज्यातील समग्र दर्शनच यावेळी स्नेहपुर्ण – भावनिक वातावरणात दिवसभर दिसून आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!