
कोल्हापूर : जिल्ह्यातील समाजकारण, राजकारण, क्रीडा क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हिंदूराव ज्ञानदेव पाटील उर्फ एचडी बाबा (वय ८६) यांचे आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी निधन झाले. मागील दोन महिन्यांपासून ते आजारी होते. सकाळी ११ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसच्या वाटचालीत एच.डी. पाटील उर्फ बाबा यांचे भरीव योगदान आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेते मा. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होत. विविध सामाजिक संस्थांवर ते कार्यरत होते. त्यांनी दहा वर्षे एमएसईबीचे (पूर्वीचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) संचालक पदाचा कार्यभार सांभाळला. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. कोल्हापूरच्या इतिहासात झालेल्या दत्तक विधान प्रकरणात ते बाबी राजे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्य होते.
पहिल्यापासूनच राजकारणात आपला ठसा उमटवला असल्याने त्यांच्या अंत्ययात्रेवेंळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पंचगंगा स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, आर.के. पोवार, राजेश लाटकर, अनिल साळोखे, अनिल कदम आदी उपस्थित होते.
Leave a Reply