

ग्राहकांचा हा वाढता कल पाहून व्होडाफोन इंडियाने आज महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळासाठी फर्स्ट रिचार्ज (एफआर) – 445 ही योजना जारी केली. खिशाला परवडणारी एकात्मिक योजना आणण्याच्या उद्देशाने ही नवी एकात्मिक डेटा योजना प्री-पेड ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
नावाप्रमाणेच फर्स्ट रिचार्ज-445 ही योजना खास व्होडाफोनच्या नव्या प्री-पेड ग्राहकांसाठी आहे. व्होडाफोनचे नवे प्री-पेड ग्राहक एफआर- 445 ही योजना 445 रुपयांत विकत घेऊन डेटा आणि अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉल्स करू शकतील.
या योजनेंतर्गत 4-जी हँडसेट वापरणाऱ्या ग्राहकांना 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा आणि अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉल्स मिळतील. ज्या ग्राहकांकडे 4-जी हँडसेट नसेल, त्यांना 35 दिवसांसाठी प्रतिदिन 2 जीबी डेटा आणि अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉल्सचा लाभ होईल. ग्राहकांना महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील कोणत्याही व्होडाफोन रिटेल टच पॉइंट्समधून रिचार्ज पॅक्स खरेदी करता येतील.
व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसायप्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, ‘आमच्या मूल्यवान ग्राहकांसाठी सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आमच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील नव्या प्री-पेड ग्राहकांसाठी व्हॉइस आणि डेटावर जास्तीत जास्त मूल्य देण्याच्या उद्देशाने पहिली रिचार्ज योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेमुळे आमच्या ग्राहकांना अतिशय विश्वासाने कनेक्टेड राहणे आणि आमच्या सर्वोत्तम नेटवर्कचा चिंतामुक्त अनुभव घेणे शक्य होणार आहे.’
Leave a Reply