संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धेतील प्रमाणपत्रे वितरण

 
कोल्हापूर:- महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सन 2016-17 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवार, दि.15 ऑगस्ट 2017 रोजी महानगरपालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या फेरीमध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.80- कनेरकरनगर क्रांतिसिंह नाना पाटीलनगर (प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे) या प्रभागास प्रथम क्रमांक तर प्रभाग क्र. 60- जवाहरनगर (नगरसेवक भुपाल शेटे) या प्रभागास द्वितीय क्रमांक मिळाला. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांर्गत प्रभाग क्र.32 बिंदू चौक (नगरसेवक ईʉार परमार) या प्रभागास प्रथम क्रमांक तर प्रभाग क्र.45- कैलासगडची स्वारी मंदीर (नगरसेवक संभाजी जाधव) या प्रभागास द्वितीय क्रमांक मिळाला. विभागीय कार्यालय क्र.3 (राजारामपूरी) अंतर्गत प्रभाग क्र. 38- टाकाळा खण माळी कॉलनी (नगरसेविका सौ.सविता भालकर) या प्रभागास प्रथम क्रमांक तर प्रभाग क्र.36- राजारामपुरी (नगरसेवक संदीप कवाळे) या प्रभागास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. विभागीय कार्यालय क्र.4 ताराराणी मार्केट अंतर्गत प्रभाग क्र.03- कसबा बावडा हनुमाननगर (स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार) या प्रभागास प्रथम क्रमांक तर  प्रभाग क्र.07 सर्किट हाऊस (नगरसेविका सौ.अर्चना पागर) या प्रभागास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
या फेरीमधील प्रथम क्रमांकास रुपये 10 हजार व प्रमाणपत्र तर द्वितिय क्रमांकास रुपये 5 हजार व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात आली. तसेच याबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी विविध वृक्षांची रोपेही देण्यात आली. संबंधित प्रभागाचे नगरसेवक/नगरसेविका व विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता यांनी संयुक्तपणे ही बक्षिसे स्विकारली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त संजय भोसले यांनी केले.
यावेळी महापालिकेच्या कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदीरच्या विद्यार्थ्यांनी स्वाईन फ्ल्यु आजाराबाबत जनजागृतीपर पथनाटय सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!