स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत सुनील तावडेंचा नर्सच्या रुपात

 

अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकीछटेच्या व्यक्तीरेखेमुळे  प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. परसूच्या भूमिकेला वैविध्य देतानात्यांनी आजवर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या विविध व्यक्तिरेखांचे आव्हान पेलत त्यांनीएक नवे आव्हान स्वीकारले असून  यापुढे ते नर्सच्या रुपात दिसणार आहेत. या नव्या रुपामागेकाही कारस्थान आहे का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. “तावडे म्हणतात, “परसू वेगळा वाटण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. त्याचं हसणं वेगळं,त्याची बॉडी लँग्वेज वेगळी, किंवा त्याची लकबही वेगळी वाटली पाहिजे. त्या दृष्टीनं मी हॉलिवूडअभिनेता हिथ लेजरची ‘द डार्क नाईट’ या चित्रपटातील जोकरच्या भूमिकेचा अभ्यास केला.” ‘दडार्क नाईट’ मध्ये जोकरचा नर्सच्या वेशातील एक सीन प्रचंड लोकप्रिय ठरला होता.तावडे यांनी सोशल मीडियामध्ये नर्सच्या गेटअपमधली फोटो नुकताच शेअर केला आहे. नर्सचेकपडे, अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला टिकली असलेला हा फोटो आहे. या फोटोलात्यांच्या चाहत्यांची मोठी दाद मिळाली असून, हजारो लाईक्स मिळाले आहेत. कारस्थानी परसूनंगेटअप बदलून काहीतरी चाल खेळली आहे. आता या नर्सच्या गेटअपमागे काही नवी खेळी आहेका हे जाणून घेण्यासाठी पहा ‘दुहेरी’ मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टारप्रवाहवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!