महापालिका सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर सौ.हसीना फरास यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये अजय सखाराम वावरे(भारतीय खेल प्राधिकरण, गुजरात येथे पॅरा ऑलंम्पिक स्पर्धेनिमित्य 1 वर्षे कॅम्पसाठी भारतीय संघाकडून निवड झालेबद्दल), सुबिया रहिमखान मुल्लाणी(डेक ऑलम्पिंक सॅमसन तुर्की येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी केली, तसेच तिने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून, सुवर्ण, सिल्व्हर, ब्रांझ पदक पटकाविलेबद्दल), अहिल्या सचिन चव्हाण (Modern pentathion ferderation of india BIATHLE, swimming competition held in puneModern pentathion ferderation of india BIATHLE, swimming competition held in puneया स्पर्धेमध्ये silver medalsilver medalमिळवलेबद्दल)  यांचा महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोप देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, परिवहन समिती सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, प्रभाग समिती सभापती सौ.प्रतिक्षा पाटील, अफजल पिरजादे, सौ.छाया पोवार, सुरेखा शहा, गटनेता शारंगधर देशमुख, सुनिल पाटील, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!