
कोल्हापूर: कोल्हापुरात साईक्स एक्स्टेंशन येथील रॉयल प्रेस्टीज येथे नव्याने सुरु झालेल्या डेनिम या ब्राँडेड कपड्यांच्या शोरूमचे मराठी सुपरस्टार गश्मीर महाजनी यांच्या हस्ते आज भव्य शुभारंभ करण्यात आला.डेनिम हा ब्रँड अतिशय नावाजलेला आहे.मला अतिशय आवडतो यामुळेच मी या शोरुमच्या उद्घाटनासाठी आलो.असे गश्मीर यांनी सांगितले.कोल्हापूर हे शहर माझे खूप आवडते शहर आहे.माझ्या पहिल्या चित्रपटाचे शुटींग इथेच झाले होते.संपूर्ण महाराष्ट्रात माझे हे फेवरेट शहर आहे.देऊळ बंद,कान्हा या चित्रपटात माझ्या वेगळ्या आणि नुकताच रिलीज झालेला मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटात मी संपूर्णपणे वेगळ्या भूमिकेत आहे असेही गश्मीर यांनी सांगितले.
भारतात १०० हून अधिक शाखा असणाऱ्या कोल्हापुरातील डेनिम हब येथे आजपासून ३ दिवस अनेक ऑफर्स सुरु आहेत.ग्राहकांसाठी अतिशय माफक दरात ब्रांडेड जेन्ट्स कपडे उपलब्ध होणार आहेत.गुणवत्ता आणि वाजवी दर यामुळे या शो रूममधील कपडे लोकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील असा विश्वास शोरूमचे बिझिनेस हेड योगेश कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी डायरेक्टर साईनाथ पाटील,दत्ता काळे, क्रिएटिव्हजचे सुजित चव्हाण यांच्यासह ग्राहक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
Leave a Reply