
कोल्हापूर : भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी शिवाजी विद्यापीठात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रातल्या चार विद्यापीठांचे आजी-माजी कुलगुरू या प्रसंगी एकत्र येण्याचा योग जुळून आला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर तसेच सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार उपस्थित होते. त्यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी शांती, सद्भावना व एकात्मतेची शपथ दिली. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह अधिकारी व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply