
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी आज झालेल्या अंतिम मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराची शिफारस न करण्याचा निर्णय निवड समिती सदस्यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी एकूण २३ अर्ज प्राप्त झाले होते. छाननी समितीकडून त्यातील २१ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यांना आज मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. २१ पैकी १३ उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. मुलाखती झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराची निवड न करता कुलसचिव पदभरतीकरिता पुन्हा जाहिरात करण्याची शिफारस निवड समितीने केली आहे.
Leave a Reply