
कोल्हापूर: हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही प्रत्येक समाजाला वेळोवेळी संरक्षण आणि न्याय देण्याचे काम शिवसेनेने अनेक वर्ष केले आहे आणि अजूनही करत आहे.पण जैन समजतील मुनींनी उगवत्या सूर्याला नमस्कार करत शिवसेनेच्या विरोधात मेळावे घेऊन समाज बांधवांची माथी भडकविण्याच काम सुरु केले आहे हे मुनींनी त्वरित थांबवावे,कोल्हापुराठी काही लबाड लोक पत्रक काढून उद्रेक होईल असा ईशारा दिला आहे अश्या समाजकंटकांना इथे थारा दिला जाणार नाही.समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अश्या लोकांना औषधाला सुध्दा कोल्हापुरात ठेवणार नाही असा ईशारा आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला.शिवाजी चौकात तीव्र निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी मुनींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे,मुरलीधर जाधव,रवी चौगुले,शिवाजीराव पाटील,सुजित चव्हाण राजू यादव,अवधूत साळोखे,शिवाजी जाधव,सौ जयश्री खोत यांच्यासह पदाधिकारी,शिवसैनिक,महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply