
कोल्हापूर: अंबाबाई मूर्तीची विटंबना करणाऱया पुजारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई व स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली आहे.
सन २००० मध्ये मंदिरातील पुजारी वसंत मुनेश्वर रामप्रसाद ठाणेकर व बाबूराव ठाणेकर यांनी मूळ अंबाबाईच्या मूर्तीला एमसील व धातूच्या पट्ट्या लावून तिची विटंबना केली होती. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या पुजार यांच्यावर जुना राजवाडा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता लेखी स्वरुपात लिहून घेऊन हे प्रकरण मिटवण्यात आले होते. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून तो संगनमताने लपवण्यात आला आहे. सदरचा गुन्हा आजही सुरूच असून याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाणे यांच्याकडे अनेक पुरावे दिले आहेत. तरीही पोलीस प्रशासनाकडून सदर पुजार्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मूर्तीची विटंबना करणे संगनमत करणे कट रचणे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणे तसेच पुरातत्त्व खात्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सदर पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
Leave a Reply