
कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील साळवे या खेडेगावातील अमोल शिवाजी यादव या मराठमोळ्या वैज्ञानिकाने मुंबईत चक्क ६ सीटर विमान बनविले आहे. कोणाला पटणार नाही पण ही सत्य आहे. त्याने हे विमान बनवून अनेक वैज्ञाणुकांनाच के तर शासनालाच तोंडात बोट घालण्यास भाग पाडले आहे. १७ वर्षंनंतर शासनाला आता त्यांचे महत्व कळले असून , मुंबई पालघर येथे १५७ एकर जमीन उपलब्ध करू दिली जाणार आहे. आणि तेथे आता विमान बनवण्याचा करखानाच सुरू केला जाणार आहे. स्वतः यादव यांनीच ही थक्क करणारी माहिती आज कोल्हापुरातील पत्रकारांना दिली. यावेळी रश्मीकांत यादव उद्योजक संतोष पाटील आणि स्टेटरजीस्ट अमित हुक्केरीकर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील साळवे हे छोट्याश्या गावी यादव यांचा जन्म झाला. वडील मुंबईत नोकरी करत होते. त्यामुळे पुढील शिक्षणही मुंबईतच झाले. पण आकाशात उडण्याची इच्छा लहानपणापासूनच असल्याने त्यांनी विमान चालवन्याचे शिक्षण अमेरिकेत जाऊन घेतले. २ ते ३ वर्षे अमेरिकेत वैमानिकाचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर ते मायदेशी परतले. पण विमान बनवण्याचे ध्येय असल्याने त्यांना त्यांचे मन गप्प बसू देत नव्हते. आर्थिक दृष्ट्या विमान बनवणे सुद्धा सोपे नव्हते. पण त्यांनी जिद्दीने विमान बनवण्याचा प्रयत्न केला. शासनाकडे विमान बनवण्यासाठी आर्थिक आणि जागेची मागणी केली. सरकार कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या घराच्या टेरेस वर चक्क ६ सीटर विमान बनवले. त्यासाठी त्यांना १७ वर्ष मेहनत घ्यावी लागली. या विमानाची चाचणी पूर्ण झाली असून विमान आता आकाशात घिरट्या घालू शकते याची आता शासनालाही खात्री झाली आहे. म्हणूनच शासनाने पालघर येथे १५७ एकर जागा उपलब्ध करून देणार आहे. आता १९ सीटर विमान बनवण्याचे काम १४ मे पासून सुरू केले आहे. या डिसेंबर अखेर हे विमान तयार होईल अशी खात्री यावेळी त्यांनी व्यक्त केली.आता जगभरातील बड्या कंपन्या सुद्धा अमोल यादव यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यादव यांचे विमान बनवण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अमोल यादव निर्मिती करणार या असणाऱ्या १९ सीटर विमानाचा वापर प्रामुख्याने रिजनल कनेक्टीव्हीटी म्हणजेच देशातील जिल्हे विमान सेवेने जोडण्यासाठी होणार आहे. भारतात ब्रिटिश काळापासून विमानसेवेने जिल्हे जोडण्यासाठी विमानतळ तयार केले होते. पण पुढे कालांतराने त्याचा वापर झाला नाही. मोठी विमाने उतरवण्यासाठी जागेची हद्दवाढ करण्यातच वेळ गेला. पण उपलब्ध जागेत लहान विमाने उतरतील याचा मात्र विचारच झाला नाही. याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Leave a Reply