
कोल्हापूर: आज गणेश चतुर्थीच्या दिवशी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती,विघ्नहर्ता,सुखकर्ता गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.शहरात आज डॉल्बीला फाटा देत लोकांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी पारंपारिक वाद्ये आणि ढोल ताशाच्या गजरात श्री गणेशाचे स्वागत केले.घरगुती गणपती त्याचबरोबर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचे आज आगमन झाले.धार्मिक आणि मंगलमय वातारणात गणपती घराघरात विराजमान झाले.पर्यावरणाचा आणि पाणी प्रदूषणाचा विचार करता लोकांमध्ये जागृती होत आहे.आज प्लास्टर ऑफ पॅरीस पेक्षा शाडूंच्या गणेश मूर्तीं खरेदीला बराच प्रतिसाद मिळाला.शाहूपुरी कुंभार गल्ली आणि गंगावेश येथील कुंभार गल्ली येथे विविध रूपातील आकर्षक आणि सुबक गणेश मूर्ती उपलब्ध होत्या.गणेश मूर्ती फक्त पुरुषांनी आणायची या प्रथेला फाटा देत आज महिला आणि मुलींनी मूर्ती घरी आणल्या.एकूणच गणपती बाप्पा मोरयाच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले.
Leave a Reply