
कोल्हापूर: दिलबहार तालीम मंडळाला यंदा 133 वर्षे पूर्ण झालेली आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील सर्वात जुनी शाहू पूर्वकालीन ही संस्था आहे. दरवर्षी याच संस्थेच्यावतीने दख्खनचा राजाही बिरुदावली घेवुन गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाच्या यावर्षी ‘दख्खनचा राजा’रूपातील श्रीगणेशमूर्तीचे जल्लोषात शुभआगमन काल मध्यरात्री उशीरा शिवाजी स्टेडियम येथील प्रशस्त जागेवर उभारलेल्या भव्य राजदरबारात झाले. आज सकाळी दख्खनचा राजा मंगलमूर्तिची प्रतिष्ठापणा विधिवत झाली. श्री मंगलमूर्ति मूर्तिकार सुखदेव आणि सुदर्शन माजगाँवकर आहेत. मूर्तिचे देणगीदार पद्माकर चिंतामणी कापसे हे आहेत.येणऱ्या या १२ दिवसात मंडळाच्या वतीने श्री गणेश पंचायतनयाग अथर्वशीर्ष जापपठण भावभक्ति गीतांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक धार्मिक विधायक उपक्रम राबवत हा गणेशोत्सव एक लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे.तिरुपतीहून आलेल्या ११ पुजारी यांच्याकडून आध्यात्मिक आणि धर्मशास्त्रोक्त पद्धतिने पुष्पमंत्रमंगल आरती उत्सव रोज सायंकाळी ८ वाजता सम्पन्न होणार आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पद्मकर कापसे यांनी सांगितले.
Leave a Reply