
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीसांनी डॉल्बी लावण्यास अटकाव केल्याने राजारामपुरी मुख्य रस्त्यावरील गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी थांबवली. यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मंडळांनी मिरवणूक जागीच थांबवली. हजारो कार्यकर्ते रस्त्यावर ठीया मांडून बसले होते.
यावेळी पोलीसांनी आमच्या डॉल्बीचे नुकसान केले आहे, असे तसे आमचे नुकसान होणारच आहे. तर आम्ही आज गणपतीची प्रतिष्ठापना आज करीत नाही, गणेश मूर्ती उद्या नेवू अशा प्रतिक्रिया डॉल्बी लावलेल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे दिल्या. ज्या मंडळांचे ढोल पथक आहेत तेही बंद करत मिरवणूक थांबवून असंख्य कार्यकर्त्यांनी रस्ता बंद केला. यावरून डॉल्बी बंदचा प्रश्न चिघळण्याची दाट शक्यता आहे.
पोलीसांनी कुठेही डॉल्बी न वाजण्याचे हमीपत्र द्यावे, तरच आम्ही मिरवणूक पुढे नेऊ, अशी मागणी या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी करीत राजारामपुरीच्या मुख्य रस्त्यावरील मिरवणूक थांबवली. मात्र पोलीसांनी डॉल्बी न लावलेल्या मंडळांना मिरवणूक सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply