
कोल्हापूर : विद्यापीठातील संगीत विभाग शिक्षकांचा त्यांच्या मानधनाबाबत पुन्हा यावर्षीही अपेक्षाभंग झालेला आहे. संपूर्ण संगीत व नाट्यशास्त्र विभाग हे या मानद शिक्षकांच्या सहकार्यानेच गेली14 वर्षे सुरु आहे. विद्यार्थी संख्या 250 पर्यंत आहे. तरीही अनेक वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. पण अनेक वर्ष मानधन वाढीच्या अनेक वेळा प्रस्ताव देऊन पोकळ बाताच केल्या जातात.प्रत्येक येणारे नविन कुलगुरु फक्त बघ्याची भूमिका घेतात. 12 महीने काम करून 8 महीन्याचे मानधन मिळते. वेळोवेळी विद्यार्थ्याची फी मानधन वाढविण्यासाठी वाढविली पण मानधन काही वाढले नाही. पण या वर्षी नूतन कुलगुरु यांनी कमालच केली. नुकत्याच झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदीना दिवशी मानद शिक्षकांचे मानधन वाढविले आहे असे आपल्या भाषणात चक्क जाहीर केले. आणि वार्षिक मानधनाचीऑर्डर काढताना तेच मानधन ठेवले आहे. कुलगुरुंच्या मोठ्या बाता पण या शिक्षकांचा मात्र अपेक्षाभंग झालेला आहे. जाहीर करूनही मानधन वाढले नाही याच्यामागे कोण आहे? किंवा कुलगुरुंच्यांच आदेशांचे पालन कर्मचारी करत नाहीत की काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
Leave a Reply