
कोल्हापूर : काही दिवस पावसाने ओढ दिल्यावर गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.यामुळे राधानगरी धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धारण 100 टक्के भरले. आज सकाळी 11 वाजून 25 मिनटाने धारण 100 टक्के भरले . पूर्ण क्षमतेने धरण भरल्याने दुपारी 12 वाजून 50 मिनटांनी 3 क्रमांकाच्या गेट मधील स्वयंचलीत एक दरवाजा तर 1 वाजून 5 मिनटांनी दुसरा दरवाजा खुला करून भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरु केला. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. प्रती सेकंद पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कत राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज आहे असेही शिंदे यांनी सांगितले.
Leave a Reply