
कोल्हापूर : मराठ्यांचा स्वात्रंतयुद्दातील लढ्यातील राजाराम महाराजांचे योगदान हे खूप मोलाचे होते आणि दर्दैवाने ते उपेक्षित राहिले. हि सर्व उपेक्षा व अन्याय दूर करून त्यांचा कार्याला न्याय देण्यासाठी अथक १५ वर्षे संशोधन करून ‘राजारामचरित्र’ हा ग्रंथ प्रकाशित केला असल्याचे डॉ जायसिंगराव पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या वतीने व इतिहास संशोधक डॉ जायसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘ शिवपुत्र छत्रपती राजाराम’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व शाहू छत्रपती यांच्या अद्यक्षतेखाली बुधवार 30 ऑगष्ट रोजी शाहू स्मारक, दसरा चौक येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खास. संभाजीराजे, मालोजीराजे हे उपस्तिथी राहणार आहेत. अशी माहिती डॉ जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शिवछत्रपती यांच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याकरिता उत्तरेहून धावून आला. त्यांचाशी मराठ्यांनी संभाजी महाराज, राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या नेतृवाखाली २७ वर्षे लढा दिला. हा लढा मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध म्हणून इतिहासात ओळखला जातो. पण दुर्दैवाने संभाजी-राजाराम-ताराबाई यांचे न नेतृत्व उपेक्षित राहिले आहे. त्यामध्ये संभाजी महाराजांच्यावर ग्रंथ प्रकशित होवून यांची काही प्रमाणत उपेक्षा दूर झाली पण राजाराम महाराज आणि ताराबाई यांची चरित्रे मात्र उपेक्षित राहिली आहेत. काही इतिहासकारांनी त्यांचा अनुल्लेखांनीच अन्याय केला.
हि उपेक्षा दूर करण्यासाठी आणि त्यांचे कार्याला उचित न्याय देणारे हे ‘राजारामचरित्र’ डॉ. पवारांनी १५ वर्षे अथक संशोधनावरून सिद्ध केले आहे. मोगली आक्रमणाला ११ वर्षे लढा दिला. जिंजी आणि तंजावरपर्यंत प्रदेशात लढाया केल्या. औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणले गेले. राजाराम महाराजांनी जिंजी किल्यावर संघर्ष करत मराठ्यांची राजधानी स्थापन केली. ८ वर्षे अथक व प्रदीर्घ दिलेला लढा. या सर्व गोष्टीसह दक्षिण सोबत दिल्ली देखील आपण जिंकू अशी दुर्दम्य महत्वाकांक्षा यांनी बाळगली होती अशा सर्व गोष्टी इतिहासातील पुराव्यासह ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत. या ग्रंथासाठी फारसी, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज कागदपत्रांचा आधार घेतलेला आहे. यामध्ये १०० हून अधिक चरित्रे देखील आहेत. लोकांचा पर्यंत खरा इतिहास पोहोचावा यासाठी हा ग्रंथ कमी शुल्क रु. ४०० मध्ये उपलब्ध केला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मंजुश्री पवार, श्रीपतराव शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.
Leave a Reply