
कणेरी: आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत भाजपा नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सांयकाळी कणेरीतील सिध्दगिरी गुरुकुलची पाहणी करत विध्यार्थी वर्गाशी संवाद साधला. सांयकाळी गुरुकुलच्या परिसरात त्यांचे पत्नी अंजली पाटील यांच्यासह आगमन होताच प .पू . मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामीजीनी त्यांचे शिक्षण घेत असलेल्या युवकानी ढोल – ताशे वाजववल्या सूरावटीसह त्यांचे जल्लोषी स्वागत केले . यानंतर गुरुकुल प्रमुख प्रियाताई शिंदेसह विक्रम पाटील व महेश मास्तोळी यांनी त्यांना सर्व परिसर ,वर्ग रचना दाखवली. यावेळी चिदानंद स्वामी, अभयानंद स्वामी यांच्यासह राहुल चिकोडे,कणेरी ग्रामस्थ उपस्थित होते . यानंतर चंद्रकांतदादा यांनी विध्यार्थी वर्गाने सदर केलेली लेझीम, लाठी काठी , समरगीतासह सुत कताई पाहत त्यांचेशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले .आणि लवकरच भरपूर वेळ येणेचे सांगत सर्वाचा निरोप घेतला .
Leave a Reply