एमपीसीटी हॉस्पीटलच्या ‘तितली ‘ या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला २० मुलांवर मोफत उपचार

 

मुंबई :महात्मा फ़ुले चॅरीटेबल ट्रस्टने सानपाडा ,सेक्टर क्रं ४ ,नवी मुंबई येथे १०० बेडसची सुविधा असलेले १२ मजली एमपीसीटी जनरल हॉस्पीटल उभारले आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देंवेंन्द्र फ़डणवीस यांच्या हस्ते ३० ऑगस्ट २०१७ रोजी या अत्याधुनिक सुविधांनी युक्त हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे .
महात्मा फ़ुले चॅरीटेबल ट्रस्ट चे व्यवस्थापकीय विशवस्त डॉ. प्रिन्स सुराणा यांच्या मते ,एमपीसीटी हॉस्पीटलमध्ये जीईचे सर्वात प्रगत पीईटी स्कॅन आहे . पीईटी स्कॅन कर्करोगाचे निदान व उपचारासाठी वापरले जाते . एमपीसीटी हॉस्पीटलने १०,००० रूपयांमध्ये पीईटी स्कॅन करण्याची खास प्रारंभिक सुविधा दिली आहे. सामान्यत: पीईटी स्कॅन करण्याचा खर्च २५,००० रूपये आहे . उद्घाटनानंतर पहिल्या ६ महिन्यांसाठी ही ऑफ़र उपलब्ध असेल . महाराष्ट्रातील रूग्ण या ऑफ़रचा लाभ घेऊ शकतात . मुंबईमध्ये पीईटी स्कॅन सुविधा असलेली फ़क्त ९ केंद्रे आहेत . पीईटी स्कॅन इमेजिंग रूग्णांसाठी अधिक सुरक्षित व लाभदायी अहेत .यामध्ये स्कॅन करण्याकरिता लागणारा वेळ कमी लागतो .आणि यासाठी रेडिओॲक्टिव्ह घटक एफ़डीजीच्या अर्ध्या डोसचीच गरज लागते .
हॉस्पीटलने महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या समुदायातील लहान मुलांचा कर्करोगासंर्दभात उपचार करण्याकरिता ” तितली ” उपक्रम हाती घेतला आहे . सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून दर महिन्याला २० मुलांचा विना शुल्क उपचार करणार आहे .
हॉस्पीटलमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी ” टू बीम ” नावाची जगातील सर्वात प्रगत लिनीअर ॲक्सेलेटर मशिन आहे . ही मशिन अत्यंत प्रभावी असून इतर सामान्य मशिनपेक्षा कमी वॆळ घेते.
हॉस्पीटलमध्ये फ़ुफ़्फ़ुसाच्या कर्करोगासाठी खास सॉप्टवेअर व हार्डवेअर आहेत . यामध्ये आजाराचे प्रमाण पाहून रूग्णाचे फ़ुफ़्फ़ुस कार्यशील ठेवण्यासाठी रॅडिएशन दिले जाते . याव्यतिरिक्त लहानात लहान ब्रेन ट्युमर्सचा उपचार करण्यासाठी सुध्दा सॉप्ट्वेअर आहेत .
हॉस्पीटलमध्ये गर्भाशयचा कर्करोग व स्तनाचा कर्करोगाच्या उपचारासाठी २४ चॅनेल ब्रॅचीथेरपी आहेत .
हॉस्पीटलमध्ये ३ अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत. ऑपरेशन थिएटर्समध्ये लॅमिनार एअर प्लो जॉइण्टलेस व ऑपरेटींग सिस्टीम आहेत .
हॉस्पीटलमध्ये २० ब्रेडची सुविधा असलेले इन्टेन्सिव्ह केअर युनिट्स आहेत . सोबत जर्मन अत्याधुनिक मॉनिटरींग सिस्टम आहेत . हॉस्पीटलमध्ये ३ अतिरिक्त बेडसची देखील सुविधा आहेत. हॉस्पीटल महाराष्ट्रातील तसेच सेंट्रल जीओसी हेल्थ स्किम व एमजेपीजेएवाय स्किममधील सर्व गरीब रूग्णांना आपली सेवा देणार आहे .अधिक माहिता करिता डॉ. प्रिन्स सुराणा ,मो: ९८३३०३८६४४ टेलिफ़िन नं :०२२-२८०२२१२२ येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!