कोल्हापूर :१९८५ साली संसदेच्या कायद्यान्वये स्थापना झालेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत सर्वसामान्य जनतेस सुशिक्षित करण्याचा एकमेव उद्देश साधला जात आहे अशी भूमिका मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ.परवेझ मसुद यांनी स्पष्ट केली. आज कोल्हापुरातील सायबर येथील मुक्त विद्यापीठाच्या केंद्रास डॉ.मसुद यांनी भेट दिली.त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले हे भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.संपूर्ण देशात ३५ लाख विद्यार्थी ये विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत.ज्यांना देशातील कोणत्याही भागातील इच्छुक नागरिक आपला नोकरी व्यवसाय सांभाळत मुक्त आणि दूरस्थ पद्धतीने घरी राहून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात आणि परीक्षाही देऊ शकतात.या विद्यापीठातील अभ्यासक्रमांना युजीसी,एआयसिटीईची मान्यता आहे.बी.ए,बीकॉम,एमबीए,एमएसडब्लू,एमए,एमकॉम यासह एकूण १५० कोर्सेस इथे शिकविले जातात.गुणवत्तामापक शिक्षण,कमी फी,प्रात्यक्षिकांसह सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जातो.इथे मिळणाऱ्या डिग्री प्रमाणपत्राला शासनाची मान्यता आहे.आपल्या गरजेप्रमाणे शिक्षण पूर्ण करण्याची सुवर्णसंधी या मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध झालेली आहे.तसेच अनुसूचित जाती आणि जमाती यांना तसेच किन्नर समजला मोफत शिक्षणाची सोय देण्यात आली आहे असेही डॉ.मसुद यांनी सांगितले.विविध क्षेत्रातील अनेक शैक्षणिक आणि व्यावसायिक,सामाजिक,आर्थिक आणि दुर्बल घटकांना आणि क्षेत्रांना अभ्यासक्रम उपलब्ध केलेले आहेत.वर्षातून दोनवेळा प्रवेश प्रक्रिया असते.जेणेकरून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या सोयीनुसार आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करता येईल.परिणामी हे विद्यापीठ देशात ज्ञानाचा आणि शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करत आहे.पत्रकार परिषदेला सहाय्यक कुलसचिव सी.बालचंदर,केंद्र संयोजक चंद्रकांत दळवी,प्रा.डॉ.दिपक भोसले उपस्थित होते.

Leave a Reply