
कोल्हापूर: इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या, बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकनं पहिल्या स्थानावर झेप घेतली. तब्बल १९ वर्षांनंतर कृष्णराजच्या रुपानं या विश्व मानांकित रेसचं विजेतेपद भारताला मिळालं आहे. इंग्लंड मधील यशानंतर कृष्णराजचं आज कोल्हापुरात आगमन झालं. रेसिंग सारख्या थरारक क्रीडा प्रकारात उत्तुंग कामगिरी केलेल्या कृष्णराजचं ताराराणी चौकात कोल्हापूरकरांनी जल्लोषी स्वागत केलं. मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर, युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आणि क्रीडा रसिकांनी भव्य रॅली काढून, कोल्हापूरच्या या खेळाडूच्या यशाचा आनंद घेतला. शहराच्या मुख्य मार्गावरुन निघालेल्या रॅलीवेळी हजारो कोल्हापूरकरांनी कृष्णराजवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कोल्हापुरचा रेसिंगपटू कृष्णराज महाडिक वयाच्या ९ व्या वर्षापासून रेसिंग खेळात सहभागी होतोय. ८ वर्षे राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धांमध्ये यशस्वी ठसा उमटवल्यानंतर, गेल्या ४ वर्षापासून कृष्णराज फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये भाग घेतोय. गेल्यावर्षीपासून तो इंग्लंड मधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या बी.आर.डी.सी. रेसिंग चॅम्पीयनशिपमध्ये सहभागी झालाय. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यंदाच्या हंगामात कृष्णराजनं टीम डबल आर रेसिंग कडून खेळताना इतिहास रचला. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी इंग्लंडमधील ब्रँडस् हॅच गॅ्रंड प्रिक्स रेसिंग ट्रॅकवर, बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील दुसर्या रेसमध्ये, कृष्णराजनं प्रथम क्रमांक अर्थात पोल पोझिशन पटकावली. तब्बल १९ वर्षानंतर भारतीय रेसरला फॉर्म्युला थ्री रेसमध्ये प्रथम स्थान पटकावता आलं. नरेन कार्तिकेयं नंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरलाय. कृष्णराजच्या या यशाची दखल संसदेनंही घेतली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कृष्णराजच्या अभिनंदनाचा संसदेत ठराव मांडला. दरम्यान आज कृष्णराज कोल्हापुरात दाखल झाला. कोल्हापूरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार्या कृष्णराजच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कृष्णराज महाडिकचं ताराराणी चौकात आगमन झालं आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन, कृष्णराजनं माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक आणि मान्यवरांचे आशिर्वाद घेतले. महादेवराव महाडिक यांनी तर कृष्णराजला खांद्यावर उचलून घेतलं. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, महापौर हसिना फरास, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके यांनी कृष्णराजचा सत्कार केला. यावेळी रामराजे कुपेकर, प्रशिक्षक सचिन मंडोडी, रामराजे कुपेकर, धैर्यशील देसाई, सुहास लटोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, विजय सुर्यवंशी, किरण शिराळे, सत्यजित कदम, सुनील कदम, शिवाजीराव कदम, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, मोहितेज रेसिंगचे अभिषेक मोहितेे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डोक्यावर फेटा परिधान केलेला आणि हातात विजयाचा चषक उंचावत, कृष्णराजनं कोल्हापूरवासीयांना अभिवादन केलं. त्यानंतर ओपन जीप मधून त्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मंथन फौंडेशनचे अध्यक्ष मारुती माने, प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० युवक-युवती हातात कृष्णराजची छबी असलेले फलक घेवून रॅलीमध्ये सहभागी झाले होते. वटेश्वर मंदिर चौकात रॅली आल्यानंतर, फुलवाले मित्र मंडळाच्यावतीनं फटाक्यांची आतषबाजी करत, पुष्पगुच्छ देवून कृष्णराजचं अभिनंदन करण्यात आलं. त्यानंतर रॅली मध्यवर्ती बसस्थानक इथं आली. तिथं सीबीएस रिक्षा स्टँडचे राजू पोवार, जाफर मुजावर, अमित पांढरे, अवी बांद्रे, बाळू गावडे यांच्यासह रिक्षा व्यावसायिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत कृष्णराजचं स्वागत केलं. त्यानंतर ट्रॅव्हल्स असोसिएशनच्यावतीनं कृष्णराजचं स्वागत करण्यात आलं. पुढं ही रॅली दाभोळकर कॉर्नर इथं आली. सार्थक क्रिएशन आणि कोल्हापूर डान्स असोसिएशन तसंच सागर बगाडे ग्रुपच्यावतीनं रॅलीचं स्वागत करण्यात आलं
Leave a Reply