
कोल्हापूर: आजच्या भेसळीच्या युगात खात्रीने शुध्द वस्तू मिळणे दुर्मिळ गोष्ट बनली आहे. रसायनाच्या अतिरिक्त वापर केलेल्या वस्तूमुळे मानवी जीवन अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांना बळी पडत आहे. लोकांना शुध्द, सात्विक वस्तू मिळाव्यात, त्यांच आरोग्य समृध्द व संपन्न व्हाव म्हणून पुज्यश्री अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजींच्या प्रेरणेने “शुध्दता,स्वास्थ, समृध्दी” या तत्वानुसार सिध्दगिरी उत्पादने आता बाजारात उपलब्ध झाली आहेत. सिध्दगिरी बझार येथे पुज्यपाद मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामीजींच्या शुभ हस्ते या उत्पादनांच विमोचन करण्यात आले. ही उत्पादने शुध्द नैसर्गिक तत्वांपासून व मानवी आरोग्यास अहानीकारक घटकापासून बनवली असून, मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारक आहेत. सिध्दगिरी उत्पादनांव्दारा शेकडॊ नैसर्गिक, सेंद्रीय व आरोग्यपुरक घटक वापरलेल्या उत्पादनांची निर्मिती करण्यात येणार आहे, त्याचा पहीला टप्पा म्हणून सिध्दगिरी चंदन अगरबत्ती,सिध्दगिरी चाफ़ा अगरबत्ती,सिध्दगिरी केवडा अगरबत्ती,सिध्दगिरी गुलाब अगरबत्ती,सिध्दगिरी कस्तुरी अगरबत्ती,सिध्दगिरी मोगरा अगरबत्ती,सिध्दगिरी आँरेंज स्क्रब सोप,सिध्दगिरी निम सोप,सिध्दगिरी लाईम सोप अशी उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहेत. सिध्दगिरीची लोकाभिमुख परंपरा व गुणवत्तापुर्णतेने बनवलेली उत्कृष्ट उत्पादने लोकांच्या विश्वासास लवकरच पात्र होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सदर उत्पादन आता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकच्या राज्यात ही लवकरच उपलब्ध होतील, सिध्दगिरी उत्पादनांच्या माहीती व वितरणासाठी वितरकांनी 76 6677 1008 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.
Leave a Reply