
कोल्हापूर : गणेशोत्सवानिमित्त दिलबहार तालीम मंडळाच्यावतीने आज शुक्रवार , दिनांक एक सप्टेंबर रोजी भव्य नेत्रत पासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . शिवाजी स्टेडियमलगतच्या दख्खनचा राजा जोतिबा रुपातील २१ फुटी गणेश मंडपाजवळच हे शिबिर सकाळी साडेदहा ते दोन यादरम्यान संपन्न होणार आहे . यासाठी कणेरी सिद्धगिरी हॉस्पीटलची आधुनिक आयबॅक व्हॅन येणार असून , या फिरत्या दवाखानामध्येच संगणकीय डोळे तपासणी नेत्रविशारद डॉ .विरेंद्र वणकुद्रे हे करणार आहेत . यावेळी ईछुकाचे नेत्रदान संकल्प फॉर्म ही भरुन घेतले जाणार आहेत . तरी याचा गरजुनी थेट सहभागी होऊन लाभ घ्यावा , असे आहवान संयोजक केले आहे .
Leave a Reply