
कोल्हापूर :घरगुती गौरी आणि गणपती विसर्जनास आज कोल्हापूरकरांनी पर्यावरणाची जोड दिली.प्रदूषण रोखण्यासाठी आता लोकांच्यातच जागृती होत आहे हे आज दिसून आले.सकाळी आठ वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला.रंकाळा,इराणी खाण,पंचगंगा घाट,कोटीतीर्थ,कसबा बावडा,राजाराम तलाव,उपनगरात गणेश विसर्जन झाले.केआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रंकाळा तलाव येथे मूर्ती दान करण्यासाठी नवी योजना राबविली.मशीनद्वारे मूर्तीतील प्लास्टर ऑफ परीस किती आहे हे बघता येत होते त्यामुळे पाणी प्रदूषण रोखूया मूर्ती दान करूया या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.२ हजार मूर्ती फक्त रंकाळा येथे दान केल्या गेल्या.अश्याच प्रकारे मूर्ती दान करा या विनंतीला लोकांनी भरगोस प्रतिसाद दिला.शहरात सुमारे ४५ हजार आणि जिल्ह्यात मुर्तीदानाचा आकडा लाखोच्या घरात पोहचला आहे.तसेच महिलानी निर्माल्या आणि गौरी पाण्यात विसर्जित केल्या नाहीत त्यामुळेच कोल्हापूरकर पर्यावरणपूरक बनले आहेत अस म्हटले तरी वावगे ठरणार नाही.महापालिकेनेही दान केलेल्या मूर्ती नेण्यासाठी चोख व्यवस्था केली होती.निर्माल्य गोळा करण्यासाठी एकटी संस्थेच्या महिलांनी सहकार्य केले.व्हाईट आर्मी,तालीम मंडळे,संस्था यांनी विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी सहकार्य केले.
Leave a Reply