
कोल्हापूर : किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या ‘बॉईज’ हा मराठी चित्रपटत येत्या ८ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.या चित्रपटातील नुकतेच ‘मी लग्नाळू’ हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. तसेच सनी लियोन हिने मराठीत पहिल्यांदाच लावणी सादर केलेली आहे. या गाण्याला यु ट्यूबवर 50 लाख लाईक्स मिळाले आहेत.सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित हा सिनेमा कम्प्लीट युथ इंटरटेनिंग असल्याचे अवधूत गुप्ते यांनी सांगितले.कोल्हापुरात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण चित्रपटाची टीम आली असता कलाकार आणि सर्व टीमने पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.यावेळी प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते म्हणाले नुकतेच प्रदर्शित झालेले या सिनेमातील ‘लग्नाळू’ हे गाणे पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात हळूवार फुलणाऱ्या प्रेमभावनेला वाट करून देते. वैभव मांगले,संतोष जुवेकर,पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील गाण्यात रितिका शोत्री ही कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळते.तसेच चित्रपट येण्याआधीच सेन्सॉरने या चित्रपटातील काही संवाद यांना आक्षेप घेतला यात जय महाराष्ट्र या शब्दालाही आक्षेप घेतला असेही गुप्ते यांनी सांगितले.
कॉलेज विश्वात पहिलं पाऊल टाकणाऱ्या नवतरुण वर्गाचे विश्वमांडणाऱ्या या गाण्याचे संगीत आणि लिखाण प्रसिद्ध गायक आणि बॉईज सिनेमाचे प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते यांनी केले आहे.गाण्यांबरोबरच ‘बॉईज’ सिनेमाचा नवा पोस्टरदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. येत्या ८ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा ‘बॉईज’ हा सिनेमा, आजच्या ‘बॉईज’ ना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी ठरणार आहे. विशेष म्हणजे गायक अवधुत गुप्ते या सिनेमाच्यानिमित्ताने प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरने आजच्या तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवले असून, या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सूकता पाहायला मिळतेय.
Leave a Reply