
कोल्हापूर: भारतीय आयुर्विमा महामंडळास यावर्षी ६१ वर्षे पूर्ण करत आहे.यामध्ये कोल्हापूर विभागाच्या वतीने १ ते ७ सप्टेंबर दरम्यान विमा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कोल्हापूर विभाग प्रमुख सुधांशु घोडगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.ते म्हणाले या सप्ताहात ३ सप्टेंबर रोजी विवेकांनद कॉलेजच्या हॉलमध्ये सकाळी ९ वाजता शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,४ सप्टेंबरला ग्राहक मेळावा आणि चेतना मतीमंद विद्यामंदिर येथे शालेपयोगी वस्तूंचे वाटप आणि ६ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती बस स्थानक येथे सर्वांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच ६ तारखेला दुपारी ४ वाजता एलआयसीच्या कार्यालय ते दसरा चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे.
यावर्षी कोल्हापूर विभागाने पश्चिम महाराष्ट्र परिक्षेत्रामध्ये २२ विभागातून १५५००० पॉलिसीसह २३४ कोटींचा नवीन व्यवसाय पूर्ण केला आहे.यामुळे कोल्हापूर,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याच्या मिळून असणारा कोल्हापूर विभाग प्रथम क्रमांकावर आहे.तसेच विविध शाखांमध्ये मागील वर्षी १०४ विमाग्राम,३४ विमा स्कूल पूर्ण करून कोल्हापूर विभागाचा लौकिक सिद्ध केला आहे.ग्राहकांचा विश्वास आणि कर्मचारी आणि एजंट यांचे कार्यक्षमता यामुळेच हा टप्पा गाठला आहे.असेही घोड्गावकर यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला विपणन प्रबंधक सौ.ऋता आजगावकर,शाखा प्रबंधक संजय ढवळे उपस्थित होते.
Leave a Reply