
कोल्हापुर: कोल्हापुरातील एक नामवंत आणि महिला विश्वातील लोकप्रिय बुटीक असलेले अग्रवाल्स डिझायनर हब आता राजारामपूरी सातव्या गल्लीतील प्रशस्त वास्तुत स्थलांतरीत झाले आहे. रविवार दि. ३ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीमंत छत्रपती महाराणी याज्ञसेनी राजे यांच्या हस्ते, या नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. गेली १४ वर्षे कोल्हापुरातील युवती – महिलांना अभिरूची संपन्न वस्त्रप्रावरणे देणार्या अग्रवाल्स डिझायनर हबचे स्वत:च्या अलिशान वास्तुत पदार्पण होत आहे. राजारामपूरी ७ व्या गल्लीतील स्टेट बँकेसमोर असलेल्या वसंत उत्कर्ष अपार्टमेंट मध्ये, अग्रवाल्स डिझायनर हबची अलिशान शोरूम आकारास आली आहे. फॅशन विश्वातील नवनवीन ड्रेसेससह पारंपारिक वेशभुषेचे अनेक प्रकार या शोरूम मध्ये उपलब्ध असणार आहेत. साड्या, घागरा- चोली, लेहंगा, ड्रेस मटेरियल, इंडो-वेस्टर्न आऊट फिटस अशा विविध डिझायनर वेअरची उंची वस्त्रं युवती महिलांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. लग्न सोहळ्यासाठी आवश्यक भरजरी साड्या, सिल्क साड्या, पार्टीवेअर ड्रेसेस, रिच डिझायनर गारमेंट यासाठी अग्रवाल्स डिझायनर हबचा लौकीक आहे. निवडक आणि अभिरूची संपन्न लेडीज गारमेंट, ड्रेसेस, साड्या, ड्रेस मटेरियल यांचे दालन म्हणून अग्रवाल्स डिझायनर हब महिला विश्वात प्रसिध्द आहे. श्रीमती बबिता अग्रवाल आणि रितेश अगरवाल यांच्या अग्रवाल्स डिझायनर हबच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन सोहळ्याला करवीरच्या जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply