
जैसलमेर: वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखों पर्यटकांना आकर्षित करुण घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळात आहे त्या अर्थाने वारसा स्थळे अर्थव्यवस्थेतील महत्वाची घटक होवू शकतात त्यामुळे प्रत्येक राज्यांनी सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करायला हवे आणि आपापल्या राज्यातील वारसा स्थळाची उत्तम देखभाल करावी असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजस्थान जैसलमेर येथे शनिवारी मांडले. ते इंडिया हेरिटेज हॉटेल असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराज गजसिंह उपस्थित होते.
पर्यटकांना जर आकर्षित केले तर लाखों कुटुंबाना स्थानिक पातळीवर उत्तम रोजगार उपलब्ध होवू शकतो आणि यामधुन अनेक आर्थिक स्वरूपाचे फायदे सर्वांना होवू शकतात असेही ते म्हणाले.
सांस्कृतिक वारसा वास्तु मागची भूमिका साधी आहे आपण आपला वारसा जतन करा तो पर्यटकांना दाखवा आणि त्या योग्य स्वतःचा विकास घडवून घ्या. इतकी साधी सोपी विचारसरणी यामागे आहे. सर्व राज्यांनी पुढाकार घेवून धोरण आखले तर पर्यटन क्षेत्राचा उपयोग आपल्याला करता येईल. या संदर्भात देशातील अनेक राजघराण्यांनी आपल्याकडिल ऐतिहासिक वास्तु सर्व सामान्यांसाठी खुल्या केल्या त्यानंतर पर्यटक आले व त्यातून रोजगार मिळाला यासाठी राजघराण्यांनी प्रयत्न केले ते उल्लेखनीय आहेत अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
मराठा इतिहासाची माहिती देताना मराठ्यांना लष्करी यश मिळाल्या नंतर त्यांनी स्वतःला सामाजिक सुधारना कार्यात झोकुन दिले. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षि छत्रपती शाहु महाराज यांचा प्रवास हेच दाखवतो. आपल्या सर्वांचे अंतिम उद्देश आर्थिकहित व सामाजिक सुधारना असले पाहिजे.
देशात जी वारसा स्थळ आहेत त्याचा भूतकाळ ऐतिहासिक आहे संपूर्ण देशभरात लाखों पर्यटकांना ही स्थळ आकर्षित करत असतात. भूतकाळापासून आजपर्यंत ही वारसा वास्तु आमची परंपरा आहे जी आज जीवंत आहे ती आपल्याला भविष्यातील पीढी पर्यंत पोहचावावी लागतील असे संभाजीराजे यांनी सांगितले.
Leave a Reply