
कोल्हापूर: वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या भ्याड खूनाचा निषेध
आज बिंदू चौक येथे सर्व परिवर्तनवादी पक्ष, संघटना, चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. बेंगलोर येथील जेष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञातांनी गोळ्या झाडून मंगळवारी रात्री हत्या केली. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आम.संपतराव पवार पाटील,उदय नारकर,सुभाष देसाई,सीमा पाटील यांच्यासह पदाधिकारी,पक्ष संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply