
कोल्हापूर: वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आज, शुक्रवारी दसरा चौक येथे कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी निदर्शने केली, तसेच हल्लेखोरांच्या अटकेचीही मागणी केली.
बेंगलोर येथील जेष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून मंगळवारी रात्री हत्या केली. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, हा पत्रकारांच्या स्वात्ंत्र्यावर झालेला हल्ला आहे,त्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर झाला पाहिजे अशी मागणी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी यावेळी केली.
अश्या प्रकारचा भ्याड हल्ला हा महाराष्ट्रातील पत्रकारांवरही होऊ शकतो आणि लेखणीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार सुरू आहे तो बंद झाला पाहिजे असे मत संपादिका सुनंदा मोरे यांनी व्यक्त केले.
पानसरे , दाभोलकर, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्यावरील हल्ला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी घटना आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण यांनी व्यक्त केले.
सत्याच्या बाजूने लिहणाऱ्या वरिष्ठ पत्रकार आणि संपादिका गौरी लंकेश यांच्या वरील हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला झाला आहे असे मत बी न्यूजचे मुख्य बातमीदार रवी कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो,पत्रकार एकजुटीचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर गौरी लंकेश यांना कोल्हापूर प्रेस क्लब च्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. कोल्हापूर प्रेस क्लबचे सह सचिव पांडुरंग दळवी, संचालक सतीश सरीकर, शितल धनवडे, शुभांगी तावरे, अभिजित पाटील, पांडुरंग पाटील ,संभाजी थोरात,शिवाजी साळोखे यांच्यासह अक्षय थोरवत,विश्वास पाटील, समीर देशपांडे, संजीव खाडे, विकास कांबळे, प्रविण देसाई,अश्विनी टेम्बे,श्रद्धा जोगळेकर,सुरेश अंबुसकर,राजाराम लोंढे, गणेश शिंदे, प्रमोद व्हनगुत्ते,मंजित भोसले, संग्राम काटकर, हिलाल कुरेशी,विजय पोवार, सुनील काटकर,विजय केसरकर,ज्ञानेश्वर साळोखे,भूषण पाटील,सदाशिव जाधव,विनोद सावंत,अमर पाटील,विश्वास कोरे,प्रकाश कांबळे,संजय देसाई,संघमित्रा चौगले,विनोद नाझरे आदित्य मोरे,दीपक जाधव यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमांचे पत्रकार,छायाचित्रकार ,कॅमेरामन उपस्थित होते.
Leave a Reply