कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्थेत ‘भाकप’चे बेहिशोबी लाखो रुपये

 

कोल्हापूर: बंगळूर येथील मार्क्सवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनामागे ‘नक्षलवाद्यांचा हात असू शकेल’ अशी शक्यता गौरी लंकेश यांचा सख्खा भाऊ इंद्रजीत लंकेश यांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला एक नवीन परिमाण प्राप्त झाले. ‘पुरोगामी-साम्यवादी’ यांचे खून पडले की त्वरीत हिंदुत्ववाद्यांकडे बोट दाखवायचे’, या साम्यवादी अंधश्रद्धेला तडा देणारी ही घटना महत्त्वाची आहे. आजवर हिंदूत्ववाद्यांनाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करून तपास केला जात आहे; मात्र या तथाकथित पुरोगामी आणि साम्यवादी मंडळींनी समाजहिताच्या नावाखाली जमवलेली बेहिशेबी मालमत्ता आणि आर्थिक घोटाळे यांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या न्यासाच्या सरकारी चौकशीमध्ये न्यासात अनेक आर्थिक घोटाळे असल्याचे सिद्ध झाले आहे. अशाच प्रकारचे आर्थिक घोटाळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील संस्थांमध्येही झाले आहेत. विशेष म्हणजे कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे 45,51,352 रुपयांची बेहिशोबी रक्कम ठेवलेली आहे. भाकपने या लाखो रुपयांचा कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या काळ्या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय अन् सीबीआय यांच्याद्वारे करावी. तसेच कॉ. पानसरे, दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या खुनांच्या मागील कारण आर्थिक गैरव्यवहार आणि नक्षलवाद्यांशी संबंध तर नाही ना, या दृष्टीने शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्मनोज खाडये आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. कॉ. गोविंद पानसरे हे कोल्हापुरातील साम्यवाद्यांचे नेते होते. तसेच ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य कार्यकारिणीचे सचिव होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली ‘श्रमिक प्रतिष्ठान’, ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्था’ अशा अनेक संस्था अन् संघटना चालत होत्या. यातील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थे’च्या लेखापरिक्षण अहवालांचा अभ्यास केला, तर वर्ष 2015-16 मध्ये या पतसंस्थेत ‘आयटक’ आणि ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’ अशा दोन साम्यवादी संघटनांच्या ठेवी आहेत. या ठेवी याच वर्षी ठेवलेल्या आहेत, असे नसून त्याआधीपासून त्या ठेवल्या गेलेल्या असाव्यात. सन 2015-2016 मध्ये श्रमिक नागरी पतसंस्थेच्या खाते क्रमांक 10105, 10106, 10107, 10109 ते 10113, 10116 ते 10122, 10124, 10131 या सर्व मिळून सूमारे 45,51,352 रुपयांच्या ठेवी आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा राष्ट्र्रीय स्तरावर नोंदणी झालेला राजकीय पक्ष असून त्याला आयकर आणि निवडणूक आयोग अशा दोन्हीकडे आपले आर्थिक कागदपत्र सादर करावे लागतात. अशा ठेवींवरचे व्याज करपात्र असते. त्यामुळे या ठेवी आणि त्यावरचे उत्पन्न पक्षाने दाखवले आहे काय याचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, भाकपने या ठेवी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या लेखापरिक्षण अहवालात दाखवलेल्याच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे लेखापरिक्षकांनी कबूलच केले आहे की, भाकपच्या राज्यस्तरीय कार्यकारीणी / पक्षघटकांनी आपले आर्थिक कागदपत्र सादर केलेलेच नाहीत. देशस्तरावरील पक्षाचे एकाच ठिकाणी आर्थिक अहवाल सादर होतात. त्यामुळे जर या पतसंस्थेतील ठेवी पक्षाने आपल्या देशस्तरीय आर्थिक कागदपत्रांत दाखवले नसतील, तर त्यातून त्याची खालील कारणमीमांसा असू शकते.पक्षाच्या वतीने पानसरे/अन्य कार्यकर्ते पक्षाचा हा काळा पैसा सांभाळत होते. पक्षाला माहितीच नसतांना पानसरे/अन्य कार्यकर्ते स्वत:चा काळा पैसा पक्षाच्या नावावर ठेवत होते.इ. अन्य कोणाचातरी काळा पैसा पक्षाच्या वतीने सांभाळला जात होता. यातली कोणतीही शक्यता खरी म्हटली तरी ती देशहितासाठी अत्यंत घातक आहे. मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला कसाबने केल्याचे सिद्ध झाल्यावरच सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशी कायम ठेवली; मात्र तो हल्ला कसाबने केलाच नव्हता असा प्रसार करणार्‍या कॉ. पानसरे यांचा अशा काळ्या पैशांशी, हवाला व्यवहारांशी संबंध असेल, तर त्याचे गांभीर्य आम्ही वेगळे सांगायला नको.पानसरे यांची हत्या झालेली आहे आणि त्यातही आधी किटाळ मुद्दाम हिंदुत्ववाद्यांवर टाकण्यात आले होते. त्यामुळे या प्रकाराला अधिक महत्त्व आले आहे. आता पोलीस यंत्रणेला स्वत:लाच माहिती नाही की खून समीर गायकवाड याने केला की अन्य कोणी अशी परिस्थिती आली आहे. ज्या पिस्तूलाने पानसरे यांचा खून झाला ते पिस्तुल सीबीआयच्या ताब्यात होते आणि खुनानंतर पुन्हा सीबीआयकडे परत पोचले आहे; परंतु कोल्हापुरचे पोलीस आता नाईलाजाने तपासाची ती दिशा टाळत आहेत.गौरी लंकेश यांच्या प्रकरणातही भविष्यात असे संकट ओढवू नये यासाठी कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार आणि कर्नाटक पोलीस यांनी आताच गौरी लंकेश यांच्याही आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी. त्यांचे मोबाईल संभाषण, बँक खात्यांचे, आर्थिक व्यवहारांचे असे सगळे तपशील तपासावेत, ही काळाची गरज आहे. शिवाय पुरोगाम्यांच्या या काळ्या पैशांच्या व्यवहाराची माहिती आम्ही अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय, आयकर विभाग, केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग, पोलीस यांनाही दिलेली आहे. त्याचाही तपास व्हावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.बजरंग दलाचे अध्यक्ष बंडा साळुंखे,महेश उरसाल, संजय कुलकर्णी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!