
कोल्हापूर: मराठा समजाचा गौरवशाली इतिहास मांडणारा आणि आतापर्यंत असंख्य मराठा मोर्चे निघाले पण पुढ काय तसेच २१ व्या शतकात मराठा समाजाची वाटचाल कशी असावी यावर प्रकाशझोत टाकणारे,प्रा.मधुकर पाटील लिखित ८० पानांच्या पुस्तकाचे प्रकाशन विशेष सरकारी वकील उज्वल निकम,कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत,मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील आणि नानासाहेब लिगाडे यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत होत आहे अशी माहिती मधुकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुस्तकाला इतिहास संशोधक वसंतराव मोरे यांनी प्रस्तावना दिली आहे.
यावेळी मराठा विद्यार्थी सेनेच्यावतीने उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.असेही प्रा.पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला भरत पाटील,भाऊसाहेब पाटील,संपतराव चव्हाण,बाजीराव किल्लेदार उपस्थित होते.
Leave a Reply