
कोल्हापूर: पर्यावरणपूरक सजावटीचे वैशिठ्य असणारा ८ वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून म्हणजे १४ ते १७ सप्टेंबर दरम्यान शाहू स्मारक भवन दसरा चौक होत आहे.यात आय.आय.टी मुंबई पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ.श्याम आसोलेकर यांचा वसुंधरा सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे.हा पुरस्कार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.आर.व्ही.भोसले यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
१४ ते १७ सप्टेंबर दरम्यान मुलांसाठी,महिलांसाठी आणि युवकांसाठी चित्रपट प्रदर्शन होणार आहे.तसेच महोत्सवात सहली,परिसंवाद,रिव्हर फन यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरु आहे.अशी माहिती उपाध्यक्ष कृष्णा गावडे यांनी दिली.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी या कार्यात आणि महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी सांगितेल.
Leave a Reply