
कोल्हापूर:रेडीओ मिर्ची ९८.३ आणि कोल्हापूर डीलर्स असोसिएशन यांच्यावतीने येत्या १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान भव्य ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन इस्तर पॅटर्न ग्राउंड,कलेक्टर ऑफिस जवळ येथे करण्यात आले आहे.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून प्रदर्शनाचे हे ५ वे वर्ष आहे.बेसिकपासून प्रीमियम कारच्या आणि टू व्हीलर गाड्यांची रेलचेल एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे.लेटेस्ट मॉडेलच्या गाड्या विशेष ऑफर्ससह इथे पहायला मिळतील.बुकिंगची सर्वोत्तम संधी इथे मिळणार आहे.स्वप्नातल्या गाड्या प्रत्यक्ष अनुभवायला आणि पहायला मिळणार आहे.अशी माहिती रेडिओ मिर्चीचे स्टेशन हेड तेजोमय खर्डेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.तरी गाडी शौकीनांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन रेडिओ मिर्ची च्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply